रात्रीला घाबरलो अन दिवसामागे धावलो
या जीवनाच्या शर्यतीत , स्वार्थामागे लागलो
डोंगर चढायच्या नादात
नेहमीची पायरी चुकली
सूर्याकडे बघताना
माझी सावली हरवली
कसला प्रवास , कसले लक्ष
मी श्वापद , सगळे भक्ष
नुसताच धावतोय एकटा
सोबत कधीच मारली
सूर्याकडे बघताना
माझी सावली हरवली
माझेच मन , माझ्याच इच्छा
नात्याच्या या वाटा कच्या
नवीन क्षितीजापायी
पायाची माती सांडली
सूर्याकडे बघताना
माझी सावली हरवली
आज भूतकाळात फिरतोय
काय काय गमावलं मोजतोय
अनेक अनोळखी डोळ्यात
माझी नावे शोधतोय
सूर्याकडे बघताना
माझी सावली हरवली
No comments:
Post a Comment