Saturday, 24 May 2025


व्यर्थ 


दिवस  पण माझा रात्र पण माझीच

पंख पण माझेच आणि उंची पण माझीच

चालता उडता प्रत्येक क्षण हि माझाच

गेलेला आणि येणारा समय हि माझाच


मीच कर्ता आणि मीच धर्ता

अशीच होती सारी शिकवण

किती चुकीची हे आज कळाले

कारण आल्या आज अनेक आठवणी


दिवसानुभवलेल्या अनेक सावल्या

आणि रात्रीतल्या त्या अनेक मशाली

त्या पंखा खालील अनेक वारे

त्या उंचीवरील अनेक तारे


प्रत्येक क्षणातील अनेक सोबती

माझ्या मार्गावरील तेवणाऱ्या अनेक वाती

या सगळ्यातला अर्थ कळताच

माझ्यातला मी पणा आज व्यर्थ ठरतोय.  


अनंत

No comments:

Post a Comment