आयुष्य
स्वप्ने असतात अशीच
पापण्या मिटताच दिसणारी
आशा हि असते अशीच
पराभव होताच हरणारी
असतात तरीही माणसे
असेच आयुष्य जगणारी
नाती असतात अशीच
पाठ फिरवताच विसरणारी
शांतीही असते अशीच
जरा जवळ येताच हरवणारी
असतात तरीही माणसे
असेच आयुष्य जगणारी
गाणी असतात अशीच
वेळ गेल्यावर गुणगुणणारी
दुःखे हि असतात अशीच
वेदना झाल्यावर परतणारी
असतात तरीही माणसे
असेच आयुष्य जगणारी
मने असतात अशीच
दुसर्यांच्या प्रवाहात वाहणारी
नजर हि असते अशीच
वळणावर पाठलाग करणारी
असतात तरीही माणसे
असेच आयुष्य जगणारी
फुलेही असतात अशीच
उमजायच्या आधीच कोमेजणारी
पाने हि असतात अशीच
वेळेआधी गळणारी
असतात तरीही माणसे
असेच आयुष्य जगणारी
जन्माची कथा हि अशीच
मृत्यू नंतर समजणारी
मृत्यूची कथाही अशीच
जन्मानंतर येणारी
असतात तरीही माणसे
असेच आयुष्य जगणारी
स्वप्ने असतात अशीच
पापण्या मिटताच दिसणारी
आशा हि असते अशीच
पराभव होताच हरणारी
असतात तरीही माणसे
असेच आयुष्य जगणारी
नाती असतात अशीच
पाठ फिरवताच विसरणारी
शांतीही असते अशीच
जरा जवळ येताच हरवणारी
असतात तरीही माणसे
असेच आयुष्य जगणारी
गाणी असतात अशीच
वेळ गेल्यावर गुणगुणणारी
दुःखे हि असतात अशीच
वेदना झाल्यावर परतणारी
असतात तरीही माणसे
असेच आयुष्य जगणारी
मने असतात अशीच
दुसर्यांच्या प्रवाहात वाहणारी
नजर हि असते अशीच
वळणावर पाठलाग करणारी
असतात तरीही माणसे
असेच आयुष्य जगणारी
फुलेही असतात अशीच
उमजायच्या आधीच कोमेजणारी
पाने हि असतात अशीच
वेळेआधी गळणारी
असतात तरीही माणसे
असेच आयुष्य जगणारी
जन्माची कथा हि अशीच
मृत्यू नंतर समजणारी
मृत्यूची कथाही अशीच
जन्मानंतर येणारी
असतात तरीही माणसे
असेच आयुष्य जगणारी