तुला बघता क्षणीच
पापण्या मीटायचेच राहून गेले
या दुखावल्या आठवणीतुन
तुला वीसरायचेच राहुन गेले
तु वळणावर समोर येता
पाठ फिरवायचे राहुन गेले
या दाटलेल्या डोळ्यातुन
बरसायचेच राहुन गेले
तुझ्या सोबतीने
चालायचे राहुन गेले
या घेतल्या वाटेवरुन
परतायचेच राहुन गेले