आकाशातील मृगनक्षत्रे
चाहूल घेती पावसाची
मनातील तुझ्या आठवणी
चाहूल घेती आसवांची
य़ॆइल पाऊस जोरात
धरणी भिजणार धारात
माझे ओठ मात्र तृषार्त
भिजणार माझ्या अश्रूत
काळ्या ढगातले ओसंडणारे मोती टिपण्यास
मोराने हि पिसारा फुलवला
तुझ्या आठवणीचे मोती कोसळता
माझा पिसारा मात्र त्यात वाहून गेला