Tuesday, 18 June 2013

दुवा

कलम को रोका न गया 
 दिल को  थामा  न गया 
 ये है कुछ शब्दोंकी अदा 
ना  है इसमे कोई वादा 

बात है गुजरे वक्त की 
जब किसी की चाह थी 
ओठोंपे भी कुछ आह थी 
जब होती थी नशा 
खाली  प्याले को  देखकर 
आंखोकी थी दशा 
उसकी राह  देखकर  


हाय , क्या कठोर दिल थी वही 
गुजरा  कल भी वही 
आज भी उसे चाहता हूँ 
दुवा उसी की  मांगता हूँ 

गुलाम


कधी कधी वाटते ,
माझे अपार दुख ,
एक गुच्छ करून 
तुझ्या पायावर वाहावे 
आणि मनास मोकळे करून 
आभाळी स्वच्छंदी उडावे 

पण कुठेतरी 
तुझ्या आठवणींच्या बेड्या 
माझ्या स्वप्नांपेक्षा  अवजड ठरतात 
आणि तुझ्या नजरेच्या 
सोनेरी  पिंजऱ्यात 
माझ्या स्वातंत्र्याच्या मर्यादा ठरतात 

आणि मी तुझा 
गुलाम होतो गुलाम होतो 

Sunday, 16 June 2013

खोड

पाऊस धुंद , मातीचा गंध 
वेड्या वेलीला झाडाचा छंद 

वाढतेय बघा  कशी प्रेमाने बिलगून 
जणू हरवलेल्या खोडाला 
देतेय नवीन अस्तित्वाची 
हिरवी कोवळी चाहूल 

झुलतोय रंग हिरवा गर्द 
त्यात वाऱ्याचा वेग मंद 

बघतोय   बघा कसा गोंजारून 
त्या निर्जीव खोडाच्या 
अंगावरचे पहिल्या पालवीचे 
हळुवार टाकलेले पाऊल 

बरसतोय थेंब जसा सूर दीर्घ  
त्यात वर्षारुतुचा संगीतमय वर्ग 

गातोय  बघा कसा आळवून 
त्या वाकलेल्या खोडाच्या 
अनेक वेलींचे , अनेक पालाविंचे
रुजलेले ,  ओवलेले  अभंग 

Friday, 14 June 2013

होंसले


 कल के बारिश  के  होंसले 
 अलग थे 
मेरे भीगने के सपने भी 
अलग थे 

 वोह तो आके 
 बरस के चली गयी 
मगर मेरे भीगने के  सपने 
अधूरे रह गये 

 तेरे साथ वक्त गुजारनेके 
लम्हे भी बहुत थे 
मगर  दास्तानोंके 
किस्से ख़तम ही   नहीं  हुए 

Thursday, 13 June 2013

आयुष्य


मेघ धन अंधारून 
पक्षी तन शहारून 
अंकुराच्या आशेपोटी 
धरती होई व्याकूळ 

कोसळेल मेघ फुटून 
 घरट जाईल वाहून 
अंकुर उगवता उगवता 
धरती जाई दुभंगून 

तरी वाट ही तृषार्त 
का चालती सारेजण 
जणू आयुष्याची गाठ 
गुंतता गुंतता जाते सुटून , जाते सुटून 

Sunday, 9 June 2013

क्षण


क्षणा क्षणा मध्ये फरक असतो 
तो दुखीही असतो 
तो आनंदीही असतो 
आठवणीत हरवलेल्या क्षणाला
तुम्ही दुखी म्हणा किंवा आनंदी म्हणा 
तो नेहमीच परका होणार असतो  

क्षणा क्षणा मध्ये फरक असतो 
तो क्षणिकही असतो 
तो अनेकही असतो 
अकस्मात आलेल्या क्षणाला 
तुम्ही क्षणिक म्हणा किंवा अनेक म्हणा 
तो लगेचच इतिहास  होणार असतो 

क्षणा क्षणा मध्ये फरक असतो 
तो जगण्यामधेही असतो 
तो मरण्यामधेही असतो 
आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला  
तुम्ही जगणे म्हणा किंवा मरणे म्हणा 
तो एक विलक्षण अनुभव असतो  

Rain Rain

wash it , wash it
all that dust and grime
all I wonder, where it goes
and come back again in  time

dance on , dance on
all those rain drops and wind chimes
all I wonder, there goes the past
allowing it to flow is not a crime

soak  it, soak it
all those earthy smells and  children's rhymes
all I wonder, this may not last longer
as demands of present are at their primes