Sunday, 13 April 2014

माणूस

भावनांचे काळे ढग
आज बरासायाचेच विसरून गेले
कारण त्यांना अडवणारे
आठवणींचे डोंगर आज मीच
उध्वस्त केले

आता ह्या डोंगरांचे तुकडे वेचतोय
हरवलेल्या पावसाची वाट बघत ,
क्षितिजाकडे नजर लावून
डोळ्यातला पावूस बांधतोय
पुढच्या प्रवासाच्या शिदोरीला

निसर्गासारखे जगायचं
जे झरे मिळतील ,त्यात चिंब व्हायचे
कधी तहान भागवायची
तर कधी कड्यावरुन
कोसळून धबधबा व्हायचे

सकाळी रात्रीला पाठी लपवायचे
आणी रात्री सकाळ म्हणून पुढे जायचे
प्रकाशाला सतत कवेत ठेवायचे
मग तो सुर्य असो किंवा दिवा
अथवा काळोखाच्या चिमटी मधला काजवा

प्रवास महत्वाचा , पाऊलखुणा नाही
क्षण जगायचा , इतिहास नाही
स्वतःला जपायचे , सोबतीला नाही
आणी हे जर नाही जमले तर
परत माणूस म्हणून जन्मायाचे  आणि माणूस म्हणून जगायचे