दोन क्षण
ते दोन क्षण प्रेमाचे
कधीतरी अनुभवलेले
किती जरी वाटले खरे
तरी शेवटी खोटे असणारे
ते दोन थेंब अश्रुंचे
कोणासाठी तरी वाहिलेले
आपल्याच डोळ्यातून
वाहून सुकणारे
ते दोन शब्द आपलेपणाचे
कधीतरी ऐकलेले
आपल्याशी नाते सांगताना
क्षणात परके होणारे
ते दोन सूर भावनांचे
मनातून झंकारणारे
जीवनाच्या साथीला असूनही
कायम बेसुरच राहणारे
No comments:
Post a Comment