Thursday, 31 October 2013

निशब्द

मला कळत नाही आहे
कि मी असा वेडा कसा झालो
सगळ्यांसारखे जगण्या ऐवजी
रोज प्रयत्न करून परत परत मेलो

तूच होतीस साक्षी ला
तरीही तुला परका झालो
तुझ्याच सोबतीने झोका घेण्या ऐवजी
हवेत उडी मारून वाऱ्यावर भिंगरी झालो

मला कळत नाही आहे
कि मी असा वेगळा कसा झालो
ना गाण्याचा सूर झालो , ना वाद्याचा ताल झालो
एका अक्रोशातला हरवलेला श्वास झालो

नाती हि होती अनेक साथी ला
तरीही त्यांना अनोळखी झालो
त्यांच्या सावलीत सुख मानण्या ऐवजी
आयुष्याच्या या वणव्यात एक ठिणगी झालो

मला कळत नाही आहे
कि मी असा कवी कसा झालो
अनेक शब्द होते , अनेक अर्थ होते
त्यातून नेमके निवडताना स्तब्ध झालो

श्रोते अनेक होते ऐकायला
तरी त्यांच्यासमोर मुका झालो
शब्दांचे खेळ खेळण्यापेक्षा ,
मी मात्र निशब्द झालो

No comments:

Post a Comment