ओल्या सकाळी , वाळलेल्या आठवणी
एक हिरवा कोंब , त्याला आभाळातील पाणी
वाऱ्याचा सूर , हरवलेली गाणी
एक मोहक शिळ , मग पक्ष्यांची वाणी
थांबलेला क्षण , त्याला आशेची झुळूक
संपलेली रात्र, तिला सूर्याची भूक
कोरडे डोळे , पण स्मित ओठ
हरवलेला मी, पण तिची भेट
तन माझे , पसरेलेले कोवळे उन
मन माझे , खेळतेय उन पाऊस
माझ्या समोरचा चाफा, त्यावर फुलांचे चांदणे
माझा सवयीचा अंधार , त्याला चंद्राचीच हौस, चंद्राचीच हौस !!
No comments:
Post a Comment