Sunday, 9 June 2013

क्षण


क्षणा क्षणा मध्ये फरक असतो 
तो दुखीही असतो 
तो आनंदीही असतो 
आठवणीत हरवलेल्या क्षणाला
तुम्ही दुखी म्हणा किंवा आनंदी म्हणा 
तो नेहमीच परका होणार असतो  

क्षणा क्षणा मध्ये फरक असतो 
तो क्षणिकही असतो 
तो अनेकही असतो 
अकस्मात आलेल्या क्षणाला 
तुम्ही क्षणिक म्हणा किंवा अनेक म्हणा 
तो लगेचच इतिहास  होणार असतो 

क्षणा क्षणा मध्ये फरक असतो 
तो जगण्यामधेही असतो 
तो मरण्यामधेही असतो 
आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला  
तुम्ही जगणे म्हणा किंवा मरणे म्हणा 
तो एक विलक्षण अनुभव असतो  

No comments:

Post a Comment