वेड्या वेलीला झाडाचा छंद
वाढतेय बघा कशी प्रेमाने बिलगून
जणू हरवलेल्या खोडाला
देतेय नवीन अस्तित्वाची
हिरवी कोवळी चाहूल
झुलतोय रंग हिरवा गर्द
त्यात वाऱ्याचा वेग मंद
बघतोय बघा कसा गोंजारून
त्या निर्जीव खोडाच्या
अंगावरचे पहिल्या पालवीचे
हळुवार टाकलेले पाऊल
बरसतोय थेंब जसा सूर दीर्घ
त्यात वर्षारुतुचा संगीतमय वर्ग
गातोय बघा कसा आळवून
त्या वाकलेल्या खोडाच्या
अनेक वेलींचे , अनेक पालाविंचे
रुजलेले , ओवलेले अभंग
No comments:
Post a Comment