कधी कधी वाटते ,
माझे अपार दुख ,
एक गुच्छ करून
तुझ्या पायावर वाहावे
आणि मनास मोकळे करून
आभाळी स्वच्छंदी उडावे
पण कुठेतरी
तुझ्या आठवणींच्या बेड्या
माझ्या स्वप्नांपेक्षा अवजड ठरतात
आणि तुझ्या नजरेच्या
सोनेरी पिंजऱ्यात
माझ्या स्वातंत्र्याच्या मर्यादा ठरतात
आणि मी तुझा
गुलाम होतो गुलाम होतो
No comments:
Post a Comment