Saturday, 24 May 2025

 काटेसावर 


वाऱ्यावरती उडती पसरती फुले कापसाची 

अशी अलगद हळुवारपणे माझ्याकडे येणारी 

जशी माझ्या बोटाना जाणीव तुझ्या स्पर्शाची 

थोडा मोहरतोय तोच नकळत  नेम चुकवणारी 


फुललेल्या काटेसावऱ्याच्या त्या अंतरंगात 

जशी रेशीम वीणनाऱ्या हळद्याची एक सुरेख ललकारी 

तुझ अस्पष्टसं सुखावणारा एक गाणं सप्तसुरात 

 जशी माझ्या कानांना सुखावह पंढरीची  वारी


उडणाऱ्या कापसावरती फांदीवरील हळद्यासाठी 

माझ्या मिठीतल्या त्या तुझ्या गारव्यासाठी 

आज ह्या काटेसावरालाही फुललीय  पालवी 

तोही चुकूनच देऊ लागलाय सावली !!!!


अनंत


वाकड खोड 


 एका झाडाच्या खोडाला

होती वाकडे वाढायची खोड

किती प्रयत्न केले तरी

काहीच निघाली नाही तोड


मित्र आले प्रेमाने बोलले

सूर्यकिरणांनी आपल्या कडे ओढले

जमिनीने पण प्रयत्न केले

तरी हे वाकडे नाही धजले


पाना फुलांना मात्र मिळाली होती सजा

आधारलेल्या वेलींची चालली होती मजा

नात्यांच्या या गुंता गुंतीत

कसला जमाखर्च नुसतीच वजा


वाकडे हि सुरवातीला असते कि हो सरळ

किती उलटे आणि किती सुलटे ,

किती दूर आणि किती जवळ

प्रासंगिक असते ती एक भुरळ


शेवटी खोडाचे काय हो

कुणालाच नसते त्याचे महत्व

फांद्यांच्या गोंधळात

हरवलेले असते त्याचे अस्तित्व


अनंत


व्यर्थ 


दिवस  पण माझा रात्र पण माझीच

पंख पण माझेच आणि उंची पण माझीच

चालता उडता प्रत्येक क्षण हि माझाच

गेलेला आणि येणारा समय हि माझाच


मीच कर्ता आणि मीच धर्ता

अशीच होती सारी शिकवण

किती चुकीची हे आज कळाले

कारण आल्या आज अनेक आठवणी


दिवसानुभवलेल्या अनेक सावल्या

आणि रात्रीतल्या त्या अनेक मशाली

त्या पंखा खालील अनेक वारे

त्या उंचीवरील अनेक तारे


प्रत्येक क्षणातील अनेक सोबती

माझ्या मार्गावरील तेवणाऱ्या अनेक वाती

या सगळ्यातला अर्थ कळताच

माझ्यातला मी पणा आज व्यर्थ ठरतोय.  


अनंत

Sunday, 5 July 2015

खुशियोंके किनारे

रातके परदे पे 
पल  चमका ये गुमसुम 
चांदनी के होठोंपे 
यादें है तब्बसुम 

कल्पना  की राहों पर 
हवाओंकी है ये बोली 
कल के सूरज को 
चाँद की है ये डोली 

बादलोंके सर पे जो 
सपनोंके बंधे सेहरे 
हौसलों का बरसा पानी
आशाओंकी कश्तियाँ , खुशियोंके किनारे ----

ओल्या सकाळी

ओल्या सकाळी , वाळलेल्या आठवणी 
एक हिरवा कोंब , त्याला आभाळातील पाणी 
वाऱ्याचा सूर , हरवलेली गाणी 
एक मोहक शिळ , मग पक्ष्यांची वाणी 

थांबलेला क्षण , त्याला आशेची झुळूक 
संपलेली रात्र, तिला   सूर्याची भूक 
कोरडे डोळे , पण स्मित ओठ 
हरवलेला मी, पण तिची भेट 

तन  माझे , पसरेलेले कोवळे उन 
मन माझे , खेळतेय उन पाऊस 
माझ्या समोरचा चाफा, त्यावर फुलांचे चांदणे 
माझा सवयीचा अंधार , त्याला  चंद्राचीच हौस, चंद्राचीच हौस !!

Sunday, 13 April 2014

माणूस

भावनांचे काळे ढग
आज बरासायाचेच विसरून गेले
कारण त्यांना अडवणारे
आठवणींचे डोंगर आज मीच
उध्वस्त केले

आता ह्या डोंगरांचे तुकडे वेचतोय
हरवलेल्या पावसाची वाट बघत ,
क्षितिजाकडे नजर लावून
डोळ्यातला पावूस बांधतोय
पुढच्या प्रवासाच्या शिदोरीला

निसर्गासारखे जगायचं
जे झरे मिळतील ,त्यात चिंब व्हायचे
कधी तहान भागवायची
तर कधी कड्यावरुन
कोसळून धबधबा व्हायचे

सकाळी रात्रीला पाठी लपवायचे
आणी रात्री सकाळ म्हणून पुढे जायचे
प्रकाशाला सतत कवेत ठेवायचे
मग तो सुर्य असो किंवा दिवा
अथवा काळोखाच्या चिमटी मधला काजवा

प्रवास महत्वाचा , पाऊलखुणा नाही
क्षण जगायचा , इतिहास नाही
स्वतःला जपायचे , सोबतीला नाही
आणी हे जर नाही जमले तर
परत माणूस म्हणून जन्मायाचे  आणि माणूस म्हणून जगायचे

Thursday, 23 January 2014

The autumn leaf


if I look at my fate
 there should not be colors and sprouts
 but can I wait  and say,
 I have my own doubts

my destiny may be to fall
 and lay somwhere on ground
 but can I wait,and say,
 I dont want to see the rains and cloud

I was red and then full green
 there is yellow waiting  in wing
 but can I wait,and say
 I dont want to fly with wind

Summer leads to spring
 and spring leads to rains
 but can I wait,and say
 I love only one to remain sane

Its my journey
 I have to travel
 but can I wait,and say
 its nature's quote you need to unravel

Tidal Zone

Life is like tidal zone
It has its high and low
we all are prone
to perish or live, no one know

water can be as high
head is down even you try
just stay below the sand cover
wait for the time to get it over

Shore can be very dry
exposure may reach the sky
just get encase in a shell
and you will survive well

Water will come and go
shore will stand and bow
I tell you, nature is so tall
it will prepare you for every fall.

Thursday, 31 October 2013

निशब्द

मला कळत नाही आहे
कि मी असा वेडा कसा झालो
सगळ्यांसारखे जगण्या ऐवजी
रोज प्रयत्न करून परत परत मेलो

तूच होतीस साक्षी ला
तरीही तुला परका झालो
तुझ्याच सोबतीने झोका घेण्या ऐवजी
हवेत उडी मारून वाऱ्यावर भिंगरी झालो

मला कळत नाही आहे
कि मी असा वेगळा कसा झालो
ना गाण्याचा सूर झालो , ना वाद्याचा ताल झालो
एका अक्रोशातला हरवलेला श्वास झालो

नाती हि होती अनेक साथी ला
तरीही त्यांना अनोळखी झालो
त्यांच्या सावलीत सुख मानण्या ऐवजी
आयुष्याच्या या वणव्यात एक ठिणगी झालो

मला कळत नाही आहे
कि मी असा कवी कसा झालो
अनेक शब्द होते , अनेक अर्थ होते
त्यातून नेमके निवडताना स्तब्ध झालो

श्रोते अनेक होते ऐकायला
तरी त्यांच्यासमोर मुका झालो
शब्दांचे खेळ खेळण्यापेक्षा ,
मी मात्र निशब्द झालो

Wednesday, 30 October 2013

जख्म

कल ही तो मिले थे , मगर ऐसा लग रहा है
कि सदिया बीत गयी, यांदे तो बहुत है
मगर खिले फूलोंके तरह मुरझा जाती है
दिन तेरा हुआ और रात अकेली है
क्या करू यादों से खुश मैं था ही नहीं कभी

रात तो रोज आती है , दिन भी रोज जाता है
फिर तुम क्यों नहीं रोज साथ होती हो ,
कभी कभी चमकनेवाले चाँद का वास्ता मत देना ,
तारोंसे नाता टूट जायेगा ,मेरा रिश्ता तो सूरज से है,
क्या करू तेरे सिवा जिंदगी मैं उजाला था ही नहीं कभी

मुरझाये फुलोंका वास्ता भी मत देना
फिर कलियों से नाता टूट जायेगा
कल के मिलने का किस्सा मत दोहराना
आज के न मिलने का जख्म गहरा हो जायेगा
क्या करू तेरे सिवा जिन्दा मैं था ही नहीं कभी

Sunday, 21 July 2013

अजब

आज कुछ अजब हो गया 
मेरा मन अबोल हो गया 
ना दोस्त चाहता हूँ 
ना दुश्मन चाहता हूँ 
बस 
अपने आप से 
 कहना  चाहता हूँ 

आज कुछ गजब हो गया 
मेरा दिल बेगाना  हो  गया 
ना सुर  चाहता हूँ 
ना बोल  चाहता हूँ 
बस 
अपने आप से 
गाना  चाहता हूँ 

आज कुछ अलग हो गया 
मेरा अहम् बेजान हो गया 
ना प्यार चाहता हूँ 
ना गम चाहता हूँ 
बस 
अपने आप से 
मिलना  चाहता हूँ 
मिलना  चाहता हूँ 

Sunday, 14 July 2013

सावली

रात्रीला घाबरलो अन दिवसामागे धावलो 
या जीवनाच्या शर्यतीत , स्वार्थामागे लागलो 
 डोंगर चढायच्या नादात 
नेहमीची पायरी  चुकली 
सूर्याकडे बघताना 
माझी सावली हरवली 
  
कसला प्रवास ,  कसले  लक्ष 
मी श्वापद , सगळे भक्ष 
नुसताच धावतोय  एकटा 
सोबत कधीच मारली 
सूर्याकडे  बघताना 
माझी सावली हरवली 

 माझेच मन , माझ्याच इच्छा 
 नात्याच्या या वाटा कच्या 
नवीन क्षितीजापायी 
पायाची माती सांडली 
सूर्याकडे बघताना 
माझी सावली हरवली 

 आज भूतकाळात फिरतोय 
काय काय गमावलं मोजतोय 
अनेक अनोळखी डोळ्यात 
माझी नावे शोधतोय 
सूर्याकडे बघताना 
माझी सावली हरवली 



 



 

Friday, 12 July 2013

जख्म

ये  जख्म जो पाए है हमने 

 उनका कोई  जवाब नहीं 

क्यों दिए है ये आपने 

इसका कोई सवाल नहीं 


कब और कहा 

ना  हमे है कोई खबर 

कब  और क्यों 

तुम भी हो बेखबर 


ये दर्द तो अब है साथ 

जैसे कबर पे   रोज नए फुल 

 मर भी गए तो अच्छा  होता 

पर हो गयी जिन्दा  रहने की भूल 




Tuesday, 18 June 2013

दुवा

कलम को रोका न गया 
 दिल को  थामा  न गया 
 ये है कुछ शब्दोंकी अदा 
ना  है इसमे कोई वादा 

बात है गुजरे वक्त की 
जब किसी की चाह थी 
ओठोंपे भी कुछ आह थी 
जब होती थी नशा 
खाली  प्याले को  देखकर 
आंखोकी थी दशा 
उसकी राह  देखकर  


हाय , क्या कठोर दिल थी वही 
गुजरा  कल भी वही 
आज भी उसे चाहता हूँ 
दुवा उसी की  मांगता हूँ 

गुलाम


कधी कधी वाटते ,
माझे अपार दुख ,
एक गुच्छ करून 
तुझ्या पायावर वाहावे 
आणि मनास मोकळे करून 
आभाळी स्वच्छंदी उडावे 

पण कुठेतरी 
तुझ्या आठवणींच्या बेड्या 
माझ्या स्वप्नांपेक्षा  अवजड ठरतात 
आणि तुझ्या नजरेच्या 
सोनेरी  पिंजऱ्यात 
माझ्या स्वातंत्र्याच्या मर्यादा ठरतात 

आणि मी तुझा 
गुलाम होतो गुलाम होतो 

Sunday, 16 June 2013

खोड

पाऊस धुंद , मातीचा गंध 
वेड्या वेलीला झाडाचा छंद 

वाढतेय बघा  कशी प्रेमाने बिलगून 
जणू हरवलेल्या खोडाला 
देतेय नवीन अस्तित्वाची 
हिरवी कोवळी चाहूल 

झुलतोय रंग हिरवा गर्द 
त्यात वाऱ्याचा वेग मंद 

बघतोय   बघा कसा गोंजारून 
त्या निर्जीव खोडाच्या 
अंगावरचे पहिल्या पालवीचे 
हळुवार टाकलेले पाऊल 

बरसतोय थेंब जसा सूर दीर्घ  
त्यात वर्षारुतुचा संगीतमय वर्ग 

गातोय  बघा कसा आळवून 
त्या वाकलेल्या खोडाच्या 
अनेक वेलींचे , अनेक पालाविंचे
रुजलेले ,  ओवलेले  अभंग 

Friday, 14 June 2013

होंसले


 कल के बारिश  के  होंसले 
 अलग थे 
मेरे भीगने के सपने भी 
अलग थे 

 वोह तो आके 
 बरस के चली गयी 
मगर मेरे भीगने के  सपने 
अधूरे रह गये 

 तेरे साथ वक्त गुजारनेके 
लम्हे भी बहुत थे 
मगर  दास्तानोंके 
किस्से ख़तम ही   नहीं  हुए 

Thursday, 13 June 2013

आयुष्य


मेघ धन अंधारून 
पक्षी तन शहारून 
अंकुराच्या आशेपोटी 
धरती होई व्याकूळ 

कोसळेल मेघ फुटून 
 घरट जाईल वाहून 
अंकुर उगवता उगवता 
धरती जाई दुभंगून 

तरी वाट ही तृषार्त 
का चालती सारेजण 
जणू आयुष्याची गाठ 
गुंतता गुंतता जाते सुटून , जाते सुटून 

Sunday, 9 June 2013

क्षण


क्षणा क्षणा मध्ये फरक असतो 
तो दुखीही असतो 
तो आनंदीही असतो 
आठवणीत हरवलेल्या क्षणाला
तुम्ही दुखी म्हणा किंवा आनंदी म्हणा 
तो नेहमीच परका होणार असतो  

क्षणा क्षणा मध्ये फरक असतो 
तो क्षणिकही असतो 
तो अनेकही असतो 
अकस्मात आलेल्या क्षणाला 
तुम्ही क्षणिक म्हणा किंवा अनेक म्हणा 
तो लगेचच इतिहास  होणार असतो 

क्षणा क्षणा मध्ये फरक असतो 
तो जगण्यामधेही असतो 
तो मरण्यामधेही असतो 
आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला  
तुम्ही जगणे म्हणा किंवा मरणे म्हणा 
तो एक विलक्षण अनुभव असतो  

Rain Rain

wash it , wash it
all that dust and grime
all I wonder, where it goes
and come back again in  time

dance on , dance on
all those rain drops and wind chimes
all I wonder, there goes the past
allowing it to flow is not a crime

soak  it, soak it
all those earthy smells and  children's rhymes
all I wonder, this may not last longer
as demands of present are at their primes